आत्मनिर्भर भारतात बनले देशातील 'ब्रेथ सेफ' मास्क !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |
BeAHero_1  H x










मुंबई : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच जिथे अत्यावश्यक वस्तूंची चणचण जाणवू लागली त्यापैकी एक म्हणजे प्रत्येकाला गरजेचे बनलेले सुरक्षित आणि निर्जंतूक 'मास्क'. काही जणांनी रुमाल वापरण्यापासून सुरुवात केली. बाजारातही एन-९५ मास्कचा तुटवडा जाणवत होता. बाजारात येणाऱ्या मास्कपैकी बहुतांश मास्क हे चीनहून आयात करण्यात आल्याचे उघड झाले होते. मात्र, डिझायनर निवेदिता साबू यांनी निर्मिती केलेल्या संपूर्ण स्वदेशी आणि ब्रेथ सेफ म्हणजे श्वास घेण्यास सुरक्षित अशा मास्कला आता ग्राहकांची पसंती आहे. 


आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी उचलण्यात आलेल्या या पावलाचे सर्वत्र कौतूक होत आहे. पेशाने डिझायनर असलेल्या निवेदिता साबू यांनी स्वतःच्या व्यवसायाला थोडेसे बदल्या परिस्थितीनुसार स्वरुप दिले. भारतात मास्कचा तुटवडा जाणवत असतानाच त्यांनी मास्क निर्मिती करण्याचे ठरवले. त्या आता देशातील पहिले अधिकृत प्रमाणित असे ब्रेथ सेफ मास्क तयार करतात. विशेष संशोधन आणि तंत्रज्ञानाद्वारे मास्क निर्मितीपूर्वी 3D प्रिंट घेण्यात आली. सुरळीत डिझाईन केलेल्या या मास्कवर 4 लेअर फिल्टरेशन सिस्टम आहे. पॅकींगपूर्वी मास्कवर ८८.३३ टक्के इथिल अल्कोहॉलद्वारे निर्जंतूकीकरणाची प्रक्रीया पार पाडली जाते. सर्वसामान्य जनतेचा विचार करून हे मास्क तयार करण्यात आले आहे. या मास्कच्या ब्रॅण्डींगसाठी बॉलीवूड कलाकारांसह #BeAHero हा हॅशटॅग चालवण्यात आला आहे. सोशल मीडियाद्वारे याचा प्रसार व प्रचार केला जात असून संपूर्णपणे सुरक्षित असलेल्या या मास्कला मागणीही तितकीच आहे.



View this post on Instagram

Even in these challenging times, it is commendable how institutions like Umed Pariwar are taking care of people affected by Cerebral Palsy. As a brand with a similar and strong conscience to give back to society, it has been very gratifying to be able to help this incredible organisation in a small way by donating our masks. - NIVEDITA SABOO . . . . #NiveditaSaboo #NiveditaSabooCouture #NiveditaSabooCares #BreatheSafeMask #StaySafe #FightCorona #SocialDistancing #FlattenTheCurve #InThisTogether #Coronavirus #Covid19 #Pandemic #IndiaFightsCorona #IndiaFightsCoronavirus #Mask #Masks #FaceMask #ProtectiveMask #GlobalShapersCommunity #FashionForACause #ResponsibleFashion #Fashion #Design #FashionDesign #DesignInnovation #CerebralPalsy

A post shared by Nivedita Saboo Couture (@niveditasaboocouture) on

">
@@AUTHORINFO_V1@@