प्रियांका गांधींच्या अडचणीत वाढ : बाल हक्क आयोगाने बजावली नोटीस

    दिनांक  26-Jun-2020 14:24:55
|
Priyanka Gandhi _1 &


नवी दिल्ली : सोशल मीडियावर केलेल्या कानपूर शेल्टर होम प्रकरणासंदर्भातील एका पोस्टमुळे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा अडचणीत आल्या आहेत. प्रियंका यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टने उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांना नोटीस बजावली आहे.
आयोगाने नोटीसमध्ये प्रियंका गांधी यांना कानपूर निवारा गृह प्रकरणाबद्दल त्यांच्या फेसबुक पोस्टवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. नोटीशीत स्पष्टपणे म्हटले आहे की, वेळेत उत्तर सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल. कानपूरच्या उत्तर प्रदेश महिला आधार गृहात सात तरुणी गर्भवती असल्याचे आढळले आहे आणि ५७ जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. शेल्टर होममधील तरुणी गर्भवती असून कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्य  सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठविली आहे. 
यासंदर्भात आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडे जाब विचारला होता. याशिवाय राज्य महिला आयोगाने कानपूरच्या डीएमकडे अहवाल मागितला. या प्रकरणात, जिल्हा प्रोबेशन अधिकारी अजित यांनी कबूल केले होते की महिला निर्वासित आणि बाल सुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला राहत आहेत. प्रोबेशन ऑफिसरने सांगितले की, गर्भवती मुलीला एचआयव्ही संसर्गाची माहिती नव्हती, जर असती तर त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला असता. दरम्यान, या सर्व प्रकारानंतरही प्रियांका गांधी यांनी नोटीशीबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. मी कुठल्याही कारवाईला घाबरत नाही. मी इंदिरा गांधींची नात आहे, असेही उत्तर त्यांनी ट्विटरवर दिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.