सैन्याबद्दल टीका भोवणार : राऊतांविरोधात भाजपतर्फे तक्रार दाखल

    दिनांक  26-Jun-2020 19:46:42
|
Sanjay Raut_1  
ठाणे :'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून भारतीय सैन्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करून त्यांचा अपमान केल्याप्रकरणी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी नौपाडा, ठाणे येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.'सामना वृत्तपत्रात ' भारतीय सैन्यातील महार, गुरखा, राजपूत, मराठा या रेजिमेंट काय तंबाखू मळत होत्या काय ?' अशा अत्यंत खालच्या पातळीवर भारतीय सैन्यावर संपादकीयमधून टीका करण्यात आली. तसेच 'काल मोदी यांनी बिहार रेजिमेंटचे कौतुक केले, बिहारात निवडणूका आहेत म्हणून सैन्य दलातील 'जात' 'पात' यास महत्व दिले जात आहे, असे म्हणून संपादकांनी सैन्यदलात विनाकारण 'जात-पात' घुसवण्याचा प्रयत्न केला आहे व त्यामुळे बिहार रेजिमेंटच्या शहिद शूरवीरांचा देखील अपमान करण्यात आला आहे,' असे तक्रारीत मयुरेश जोशी यांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी संजय राऊत यांनी भारतीय सैन्याची माफी मागावी, अन्यथा आम्हास आंदोलक पवित्रा घ्यावा लागेल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळेस मयुरेश जोशी यांच्यासह भाजयुमोचे सुरज दळवी, समर्थ नायक, राज मिश्रा, कौस्तुभ गायकवाड, अमित पाटील व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.