अयोध्या श्रीराम मंदिर निर्माण : खांब पॉलिश करण्याच्या कामाला वेग

26 Jun 2020 16:39:42

ayodhya_1  H x



अयोध्या :
श्रीरामजन्मभूमी न्यास यांच्या कार्यशाळेत कोरीव काम केलेल्या जवळपास १ घनलक्ष दगडांच्या साफसफाईचे काम अधिक वेगात सुरु करण्यात आले आहे. दिल्लीतील केएलए ही बांधकाम कंपनी हे काम करीत आहे. एका आठवड्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार काम लवकर पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता त्याची सफाई व हे दगड चमकविण्याचे काम करणाऱ्या कारागिरांची संख्या सुमारे १५ झाली आहे. सुरुवातीला ५ कारागिरांनी हे दगड स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. दगडांना पॉलिश करण्यासाठी २३ प्रकारची रसायने वापरले जात आहे. या कामास अंदाजे ३ महिने लागू शकतात.



मंदिराच्या तळ मजल्याच्या बांधणीचे दगड तयार



विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी)चे मीडिया प्रभारी शरद शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, न्यास कार्यशाळेत दगडांचे कोरीव काम २८ वर्षांपासून सुरू आहे. यात १ घनलक्ष दगड कोरले आहेत. हे दगड मंदिराच्या तळ मजल्यावरील आहेत. आतापर्यंत मंदिराचे तळ मजले, सिंहद्वार, नृत्य मंडप, रंग मंडप, कोळी गर्भ गृह, खांब बीम आणि छतावरील दगड कोरले गेले आहेत. आता मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील दगड कोरण्याचे काम ही वेगात केले जाणार आहे.



ayodhya_1  H x


१९९२ मध्ये झाली कार्यशाळेची स्थापना


१९९२मध्ये श्रीरामजन्मभूमी न्यास यांनी मंदिर निर्माण कार्यशाळेची स्थापना केली होती. बर्‍याच दिवसांपासून ठेवलेल्या दगडांवर धूळ साचल्यामुळे त्यांना स्वच्छ करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक संजय जेडिया म्हणाले की, दगड स्वच्छ करण्याचे काम प्रथम पाण्याने केले जात आहे. असे असूनही, जर धूळ स्वच्छ होत नसेल तर स्टेन, एल्बो सीमेंट, धूळ रिमूव्हर आणि पेंट रिमूव्हर सारख्या रासायनिक घटकांचा वापराचा वापर केला जाईल.

Powered By Sangraha 9.0