चीनला वठणीवर आणण्यासाठी ९५०० अमेरिकन सैन्य आशियात !

    दिनांक  26-Jun-2020 13:42:25
|
Donald_Trump _1 &nbs


वॉशिंग्टन : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या तणावात आता महत्वपूर्ण वळण आले आहे. चर्चेनंतर वारंवार दगाफटका करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिका धावून आली आहे. चीनच्या हुकूमशाहीला थोपवण्यासाठी युरोपमध्ये तैनात करण्यात आलेले ९ हजार ५०० अमेरिकी सैनिक आता आशिया खंडात तैनात करणा आहे.


अमेरीकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी जर्मन मार्शल फंडच्या वर्च्युअल ब्रसेल्स फोरम २०२० मध्ये एका प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली आहे. भारत-चीन सीमेवर चीनतर्फे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. केवळ भारतच नव्हे तर व्हीएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स आणि साऊथ चायना या ठिकाणीही चीनी सैन्य डोकेदुखी ठरत आहे.


एका अहवालानुसार, अमेरिका जर्मनमध्ये तैनात केलेल्या एकूण ५२ हजार सैन्यापैकी एकूण ९ हजार ५०० सैनिकांना आशियात पाठणार आहे. चीनपासून जाणवत असलेल्या धोका लक्षात घेता अमेरिका संपूर्ण जगभरात आपले सैन्य तैनात करण्याची योजना आखत आहे. चीन नवी रणनिती आखत आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अमेरिका पूर्णपणे तयार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


ड्रॅगनची सुरू असलेली वळवळ थांबवण्यासाठी आपण युरोपियन महासंघात हा मुद्दा उचलणार असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी युरोपिय महासंघाने अमेरिकेच्या जर्मनीहून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर चीनच्या कंपन्यांवर बहिष्कार टाकून आर्थिक कमजोर करण्याची गरजही व्यक्त केली होती. चीन कोरोना महामारीचा फायदा उठवत आर्थिक गणिते मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे महासंघाच्या लक्षात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.