मालाडमधील गायब झालेले कोरोना रुग्ण अखेर सापडले

25 Jun 2020 18:18:53

malad missing _1 &nb
मुंबई : मालाडमधील गायब ५० कोरोना रुग्णांच्या शोधमोहिमेत पोलिसांच्या मदतीने ४० रुग्णांचा शोध घेण्यात पोलिकेला यश आले. या गायब रुग्णांपैकी काही खासगी, तर काही पालिकेच्या रुग्णालयात दाखल होते. तर काहींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला असल्याचे समोर आले आहे. चुकीचा पत्ता व फोन बंद असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता.
मालाड व आजूबाजूच्या परिसरात कोरोना संसर्ग वाढत असताना हे रुग्ण सापडत नसल्याने चिंता वाढली होती. तब्बल ५० रुग्णांचा शोध लागत नव्हता. प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केल्यानंतर रुग्णाचा मोबाईल नंबर व पत्ता घेतला जातो. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र मोबाईल व पत्ताही चुकीचा असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मोबाईल नंबर बंद होता, मात्र पत्ताही चुकीचा असल्याने शोधणे कठीण झाले. या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना या रुग्णांना शोधून काढणे आवश्यक होते. त्यामुळे पालिका व पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. अखेर पोलिसांना ५० पैकी ३० व पालिकेने १० जणांना शोधून काढले. यातील काही जण खासगी व पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत होते. तर काहींना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला होता. काहींच्या घरी कोणीच नसल्याने त्यांचा फोन बंद होता. तर पत्ताही चुकीचा असल्याचे समोर आले, अशी माहिती सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. दरम्यान असे प्रकार होऊ नयेत यासाठी नियमित ट्रेसिंग प्रोसेस सुरु ठेवली जाईल. यावेळी पोलिसांनाही वेळोवेळी कळवून मदत घेतली जाणार असल्याचेहे कबरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0