महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरूच : काँग्रेस नेत्यांच्या बैठका

    दिनांक  25-Jun-2020 17:28:29
|
Congress_Shivsena _1 

मुंबई : राज्य सरकारमध्ये महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम असल्याची चर्चा आहे. राज्याचे मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक यासाठी बोलावण्यात आली होती. यात राज्य सरकारच्या निर्णयातील काँग्रेसच्या भूमिके संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयांमध्ये काँग्रेसला सहभागी करून घेत नसल्याची खंत वेळोवेळी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करून दाखवली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत.


यापूर्वी थोरातांनी अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तीन पक्षांचे सरकार चालवत असताना होणारी तारांबळ पाहता वेळोवेळी भाजपकडूनही यावर टीका करण्यात आली. यापूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारमध्ये सक्रीय सहभागी नसल्याची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. खुद्द राहुल गांधींनीही आम्ही सरकारमध्ये सक्रीय नाहीत, अशी कबुली दिली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.