राज्यात गेल्या २४ तासांत ३ कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू

    दिनांक  25-Jun-2020 15:59:14
|

Police_1  H x W
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. एकीकडे कोरोना संक्रमण थांबावे म्हणून पोलीस रस्त्यावर तैनात आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यामध्ये पोलीस दलांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ३ पोलिसांचा मृत्यू झाल आहे. कर्तव्य बजावत असताना आत्तापर्यंत राज्यात एकूण ५४ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
 
 
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये अजूनही ९९१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १०६ पोलीस अधिकारी तर ८८५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यभरात कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३५ हजार ४३१ गुन्हे नोंदविण्यात आले. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या ७४६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.