दिल्लीत हॉटेल, गेस्टहाऊसमध्ये यापुढे चीनी नागरिकांना थारा नाही!

25 Jun 2020 14:53:12

china_1  H x W:



दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशनचा निर्णय!

दिल्ली : लडाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनने काढलेल्या कुरापतींमुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही लाट भारतातील उद्योग आणि व्यवसायिकांध्येही पाहायला मिळते आहे. त्यातूनच दिल्ली येथील हॉटेल व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे की, यापुढे आपल्या हॉटेलमध्ये चीनी नागरिकांना निवासासाठी जागा दिली जाणार नाही. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅटने काही दिवसांपूर्वीच अवानह केले होते की, भारतीय व्यवसायिकांनी चीन वस्तू खरेदी करु नयेत तसेच विकूही नयेत. कॅटप्रमाणेच आता दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशनद्वारा हा निर्णय घेतल्याचे दिसते.


दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, चीनचे वर्तन पाहता आम्ही निर्णय घेतला आहे. एका आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये आजघडीला सुमारे ३००० पेक्षाही अधिक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेस आहेत. तर एकूण खोल्यांची संख्या जवळपास ७५००० हजारांच्या आसपास आहे.


दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशन प्रमुख महेंद्र गुप्ता यांनी सांगितले की, चीन भारतासोबत ज्या पद्धतीने व्यवहार करतो आहे ते अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, आमच्या हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेसमध्ये चीनी नागरिकांना रहायला जागा दिली जाणार नाही. चीनी नागरिकांसाठी आमच्याकडील खोल्यांचे दरवाजे बंद असतील. चीनी वस्तू वापरातून हद्दपार करण्याची एक मोहीम देशभरात सुरु आहे. त्याच मोहिमेत आम्हीही सहभागी होत असून आम्ही चीनी नागरिकांना जागा दिली जाणार नाहीय.



Powered By Sangraha 9.0