हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

governor_1  H x



मुंबई :
महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावीत असताना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजून अतिशय दु:ख झाले. हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळव‍ितो, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.



दरम्यान, भारत-चीन सैन्यामधील वाढता संघर्ष लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गलवान खोऱ्यातून वाहणाऱ्या नदीवर भारतीय सैन्याची एक तुकडी पूल उभारणी करत असताना अचानकपणे नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे पुल बांधणी करत असलेले काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले सचिन मोरे यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. दरम्यान, जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला दगडचा जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती सचिन यांच्या धाकट्या बंधूंना तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.शहीद सचिन मोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, सहा महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे येथे, तर शनिवारी साकुरी येथे आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@