लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्यांना देश कायम स्मरणात ठेवेल : पंतप्रधान

25 Jun 2020 15:22:30

PMO_1  H x W: 0



नवी दिल्ली :
भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये २५ जूनची तारीख काळा दिवस म्हणून लक्षात ठेवली जाते, कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज त्याला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत.




यावरून भाजपने नेहमीच कॉंग्रेसला घेरले आहे. याचनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ट्विट केले होते जे आपत्कालीन काळात लोकशाहीच्या बचावासाठी लढा देणाऱ्यांची स्मरण करणारे होते. मोदी यांनी ट्वीट केले की, 'ठीक ४५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी ज्या लोकांनी भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला, अत्याचार सहन केले, त्या सर्वांना मी सलाम करतो ! त्यांचा त्याग आणि संघर्ष देश कायम स्मरणात ठेवेल.'




त्याचवेळी, यापूर्वी आणीबाणीवरून  काँग्रेसवर निशाणा साधताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, '४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लोभामुळे देशात आणीबाणी लागू झाली. एका रात्रीत देशाचे रूपांतर तुरुंगात झाले. पत्रकार, न्यायालये, भाषण...यांच्यावर बंधने आली. गोरगरीब व दलितांवर अत्याचार झाले. कोट्यवधी लोकांच्या प्रयत्नांमुळे आणीबाणीची परिस्थिती दूर झाली. भारतात लोकशाही पूर्ववत झाली पण ती आजतागायत कॉंग्रेसमध्ये गैरहजर राहिली. कुटुंबाचे हित व पक्षाच्या आवडी या राष्ट्रीय हितसंबंधांवर हावी झाल्या. ही खेदजनक परिस्थिती आजच्या कॉंग्रेसमध्येदेखील अस्तित्वात आहे.'

गुरुवारी भाजपने एक व्हिडिओ शेअर केला आहे. २५ जून १९७५ आणीबाणी लोकशाहीतील ब्लॅक चॅप्टर या शीर्षकाखाली हा व्हिडीओ शेअर केला. त्याशिवाय भाजपने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, "कॉंग्रेसची काळी कृत्य आणि भारतीय लोकशाहीचा सर्वात वाईट अध्याय २५ जून १९७५आणीबाणीच्या विरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजाला वंदन."अशा आशयाचे ट्विट करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0