शहीद सुनील काळे अनंतात विलीन!

    दिनांक  24-Jun-2020 11:52:30
|

sunil kale_1  Hपाणावलेल्या डोळ्यांनी, जड अंत:करणाने गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप!


सोलापूर : पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत लढतान शहीद झालेले सोलापुरातील सुनील काळे अनंतात विलीन झाले आहेत. लष्करी इतमामात त्यांच्यावर पानगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे बंधू नंदकिशोर काळे आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने सुनील काळे यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.


सीआरपीएफ, तसेच ग्रामीण पोलिसांनी शहीद सुनील काळे यांना मानवंदना दिली. सुनील काळे यांना निरोप देण्यासाठी आरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील सुनील दत्तात्रय काळे शहीद झाले. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसेच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत.सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.