धक्कादायक ! पाकचे तब्बल १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

24 Jun 2020 12:34:38

team pak_1  H x
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कोरोनावर नियंत्रण नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. नुकतेच शहीद आफ्रिदी कोरोनाबाधित झाल्याने क्रीडा विश्वात चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यावर आता पाकिस्तानचे तब्बल १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी तीन खेळाडूंना कोरोना झाल्याची माहिती होती. त्यानंतर मंगळवारी आणखी ७ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नव्याने आयोजित करण्यात पाकिस्तानचा इंग्लंड दौराही संकटात सापडला आहे.
 
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी फखर झमान, इमरान खान, काशिभ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज या सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्याआधी सोमवारी शादाब खान, हारिस रऊफ आणि हैदर अली यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.” यामुळे क्रिकेटचे सामने आयोजित करणार की नाही? यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
कोरोनामुळे क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटचे सामनेही रद्द करण्यात आले होते. यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणारा हा क्रिकेटचा पहिलाच सामना होणार होता. मात्र, त्यावरही आता कोरोनाचे काळे ढग दाटले आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीलाही कोरोनाचा लागण झाली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0