कौतुकास्पद ! सिद्धिविनायक मंदिर उचलणार शहीद जवानाच्या मुलाचा शिक्षण खर्च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

Sunil kale_1  H
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत सोलापूरचे सुनील काळे यांना वीरमरण आले. ते मुळचे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील राहणारे होते. सीआरपीएफ जवान सुनील काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
 
 
१८२ व्या बटालियन सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांना जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान हौतात्म्य आले होते. लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या २३ जून रोजी पहाटे संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यामध्ये सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@