नाही सुधारला 'ड्रॅगन' ! : सीमेवर फौजफाटा पुन्हा वाढवण्याची तयारी

    दिनांक  24-Jun-2020 21:38:00
|
India Ladakh_1  नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील तणावावर सुरू असलेल्या चर्चेनंतरही नियंत्रण चीनी सैनिकांनी अद्याप माघार घेतली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. LAC वर आणखी सज्जतेने रणनिती करण्याची तयारी चीन करत असून हालचाली पूर्वीपेक्षा अधिक सावध करत असल्याचे वृत्त एनएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. चीनी सैन्याने एलएसी आणि पूर्व लडाख सेक्टर येथे चार मे पासून १० हजारांहून जास्त सैन्य तैनात केले होते.


पांगोंग त्सो तलावाच्या नजीक चीनी सैनिकांकडून लष्करी हालचाली वारंवार केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताने फिंगर ८ पर्यंतच्या प्रदेशावर दावा केला आहे, परंतू चीनी सैनिकांनी भारतीय सैन्याला फिंगर ४ पर्यंत रोखून ठेवले आहे. चीनी सैनिकांकडून या भागात लष्करी हालचाली सुरू आहेत. चीनीच्या बाजूने भागात आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा आक्रमकपणे प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गलवान नदी भागात दोन्ही सैन्यांची हानी झाली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.