नृत्यदिग्दर्शिका सरोज खान रुग्णालयात दाखल!

24 Jun 2020 09:36:21

Saroj Khan_1  H



श्वास घेण्यास त्रास; मात्र क्रोरोना अहवाल निगेटिव्ह!


मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याना रुग्णालयात भर्ती करण्यात आले. कुटुंबाशी संबंधित स्त्रोतांनी ही माहिती दिली आहे. सरोज खानची कोरोना टेस्ट झाली आहे आणि तिचा कोरोना रिपोर्ट नकारात्मक आला आहे. यापूर्वीही सरोज खानला डायलिसिससाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.


७१ वर्षीय सरोज खान बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. १९८३ मध्ये त्यांनी ‘हिरो’ चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम करण्यास सुरवात केली. सरोज खानने बॉलिवूडमधील बरीच गाण्यांवर कोरिओग्राफ केले आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्या सुपरहिट असलेल्या अनेक गाण्यांचे कोरिओग्राफ केले आहे.


२०१९ मध्ये सरोज खान यांनी आपल्या कामामध्ये कमबॅक केला होता आणि मल्टीस्टारर फिल्म ‘कलंक’ आणि कंगना रनौत यांच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील प्रत्येकी एका गाणे कोरिओग्राफ केले होते. सरोज खान यांनी बर्‍याच चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यांना तीनदा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. सरोज खान यांनी काही चित्रपटात लेखक म्हणूनही काम केले होते.
Powered By Sangraha 9.0