मुंबई महानगरपालिकेचे आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग”!

    दिनांक  24-Jun-2020 16:33:50
|

BMC_1  H x W: 0


लवकरच उपलब्ध होणार १ लाख ॲन्टीजेन टेस्टींग कीट; अर्ध्या तासाच्या आत कळणार अहवाल

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्याला आळा घालायला पालिकेतर्फे होत असलेल्या प्रयत्नानाही यश येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आता कोणतीही कसर न ठेवता आणखी आक्रमकरित्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेने आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतले आहे. अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.


महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत विविध अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी विविध निर्देश दिले आहेत.


राज्य शासनाने परवानगी दिलेल्या एसडी बायोसेन्सर कंपनीच्या कीटद्वारे ॲन्टीजेन टेस्टींग करण्यात येणार आहे. या चाचणीचा परिणाम हा १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. होते. महानगरपालिकेने ॲन्टीजेन कीटच्या १ लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात आणण्यात येणार आहेत.


दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयांनीदेखील या शासनमान्य ॲन्टीजेन टेस्ट कीट खरेदी कराव्यात आणि त्याचा उपयोग करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.