मुंबईतील मानखुर्दच्या झोपडपट्टीला भीषण आग

    दिनांक  23-Jun-2020 09:33:26
|

Mankhurd_1  H x


भंगाराच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : मानखुर्दच्या मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. या आगीत इथे असलेली अनेक गोदामे खाक झाली आहे. मंडला परिसरातील केमिकल, भंगारच्या गोदामांना आग लागली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


मानखुर्दमधील निलकंठेश्वर झोपडपट्टीत प्लॅस्टिक भंगारचे गोडाऊन आहे. सकाळी अचानक तेथून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर आग लागल्याचे समोर आले. यानंतर तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. ही आग लेव्हल ३ प्रकारची गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आग नियंत्रणासाठी घटनास्थळावरअग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. अद्याप या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, परिसरात भीतीचं वातावरण आहे.


या आगीने आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांनाही आपल्या भक्षस्थानी घेण्याची भीती आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळेच आगीवर नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत लागलेल्या या भीषण आगीत असंख्य झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची भीषणता इतकी मोठी होती की धुरांचे लोट आकाशात पसरले होते. सुदैवाने यात अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.