भारत - पाक मालिकेची नितांत गरज : शोएब मलिक

23 Jun 2020 17:59:37

Shoib Malik_1  
 
नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. तसेच भारता आणि पाक यांच्यातील वादामध्ये आता चीन्न्सोबत चाललेल्या वादाचीही भर पडली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंकडून भारत आणि पाकिस्तानमधील मालिकेची मागणी होत आहे. शोएब अख्तरनंतर आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यानेदेखील ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मालिका खेळवली गेली पाहिजे’ अशी मागणी केली आहे.
 
 
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने एका मुलाखतीत सांगितले की, “या दोन देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या अॅीशेस मालिकेप्रमाणे एखादी मालिका असावी. जग या मालिकेची वाट पाहत आहे. अॅ शेसशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटबद्दल विचार करू शकतात का? दोन्ही मालिका उत्कटतेने खेळल्या जातात. या मालिकेच्या भूतकाळाचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे आम्ही खेळत नसल्यामुळे लाज वाटते आहे.” दोन्ही आशियाई देशांनी राजकीय मुद्द्यांमुळे २००७ पासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. आयसीसी स्पर्धा किंवा आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ फक्त आमनेसामने सामने आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0