भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढवायची होती !

    दिनांक  23-Jun-2020 17:03:46
|
DF_1  H x W: 0

दोन बैठकाही झाल्या; फडणवीसांचा गौप्यस्पोटमुंबई : विधानसभा निवडणूपूर्वी भाजपने राष्ट्रवादी सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी दोन बैठका झाल्या होत्या. मात्र, शिवसेनेला वगळून ही युती शक्य होणार नाही, अशी भूमीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती, असा मोठा गौप्यस्पोट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.


पत्रकार राजू परुळेकर यांनी 'इनसायडर'साठी घेतलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. आम्ही शिवसेनेची साथ त्यावेळी सोडली नव्हती, ती गोष्ट आज शक्य झाली असती तर विचारांविरोधात जाऊन सरकार चालवण्याची वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती असा मोठा गौप्यस्पोट फडणवीस यांनी केला आहे.


राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज असेल तर शिवसेनेला सोडून आम्ही युती करणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजप नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पोहोचवला होता. त्यामुळे या सगळ्यात शिवसेनेने काय कमावले आहे, हे मला अद्याप समजू शकलेले नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. अजित पवार यांच्यासह जाऊन सत्ता स्थापनेबद्दलच्या अनेक गोष्टी आम्ही वेळ आल्यावर नक्की उलगडू तसेच मी यावर एक पुस्तक लिहीणार असल्याचे मत यावेळी फड़णवीस यांनी व्यक्त केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.