दिल्ली हिंसेतील आरोपी सफूराला जामीनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत

    दिनांक  23-Jun-2020 19:29:36
|
Safura Jargar_1 &nbs


नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने जामिया को-ऑर्डीनेशन समिती सदस्य जामिया विद्यार्थीनी सफूरा जरगरला जामीन दिली. फेब्रुवारीत दिल्लीतील हिंसा प्रकरणात तिच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. न्यायालयाने १५ दिवसांत किमान एकदा फोनद्वारे संपर्कात राहण्याचे निर्देश केले आहे. तसेच अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यवाहीत सामील न होण्याचे निर्देशही दिले आहेत. दिल्ली सोडून जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे, असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी सोमवारी दिल्ली पोलीसांनी तिला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. कायदा सुव्यवस्था बिघडवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेत बाधा आणण्याचा तिने प्रयत्न केला असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. तिच्याविरोधात या संदर्भात अहवाल आढळला आहे. तिच्यासह अन्य विद्यार्थ्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप पोलीसांनी केला. या प्रकरणी पोलीसांकडे न्यायालयाने अहवाल मागवला आहे.जामिया मिल्लिया इस्लामियाची विद्यार्थीनी सफूरा जरगरने जामीनासाठी अर्ज केला. पोलीसांनी सफूरा मोठ्या कटाचा हिस्सा असल्याचे म्हटले होते. तिच्यामुळे नुकसानच नव्हे तर जनतेची सुरक्षाही धोक्यात येऊ शकली असती असा दावा पोलीसांनी केला होता. १० एप्रिल रोजी तिला पोलीसांनी अटक केली होती. तिच्याविरोधात उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसा भडकवण्याचा आरोप करण्यात आला होता. पोलीसांनी बेकायदा कृत्य केल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली होती. यापूर्वीच्या न्यायालयात जामीनाचा अर्ज रद्द झाल्यानंतर तिने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. ती गर्भवती असल्याचे तिने म्हटले. तिच्या सुटकेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी मागणी केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.