लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाख दौऱ्यावर!

23 Jun 2020 16:15:04

Army cheif_1  H



भारत-चीन सीमेवर शांतता लागू करण्यास दोन्ही देशांची सहमती

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाख दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय लेह-लडाख दौऱ्यात लष्कर प्रमुख ग्राऊंड कमांडर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.


दरम्यान, गलवान हिंसाचाराच्या ७ दिवसांनंतर भारताच्या दबावापुढे अखेर चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे. चीन सीमेवरील मॉल्डो येथे दोन्ही देशांतील लष्कराच्या लेफ्टिनेंट जनरल स्तरावर चर्चा झाली. यामध्ये लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये तणाव कमी करण्याच्या हेतूने वादग्रस्त जागेवरून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रथमच चीनने १५ जून रोजी झालेल्या हिंसाचारात आपला एक कमांडिंग ऑफिसर मारला गेल्याची कबुली दिली आहे. या अधिकाऱ्यासह आपले २ सैनिक मारले गेले असेही चीनने म्हटले आहे. भारतीय माध्यमांवर त्या हिंसाचारात चीनचे ४० सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. याच हिंसाचारात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या हिंसाचारात चीनच्या सैनिकांनी खिळे वेल्डिंग केलेल्या रॉडने भारतीय सैनिकांवर प्रहार केले होते.



Powered By Sangraha 9.0