मुंबईत ७० कोरोनाग्रस्त गायब? पोलिसांचा शोध सुरु...

    दिनांक  23-Jun-2020 16:39:57
|

mumbai_1  H x W
मुंबई : दिवसेंदिवस मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. एकीकडे प्रशासनाच्या कारभारावर विरोधक बोट ठेवता असताना दुसरी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईमधील ७० कोरोनाग्रस्त रुग्ण गायब झाले असून मुंबई महानगरपालिकेने आता त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी या रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
 
 
अचानक ७० कोरोनाग्रस्त रुग्ण गायब होतातच कसे? असा प्रश्न आता विरोधक विचारू लागले आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या पी वार्डातील कोरोनाबाधित तब्बल ७० रुग्ण बेपत्ता झाले आहेत. बीएमसीच्या विनंतीनंतर मुंबई पोलीस या ७० रुग्णांचा तपास घेत आहेत. त्यांच्या मोबाईल फोनची शेवटची लॉकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे व त्यांच्या कुटुंबाचीदेखील चौकशी केली जात आहे. याआधी देखील मुंबईतून अनेक कोरोनारुग्ण गायब झालेले आहे. मात्र आता स्वतः महानगरपालिकेनेच हे रुग्ण गायब झाल्याची माहिती दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
 
हे सर्व ७० रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या के पी नॉर्थ वॉर्ड म्हणजेच मालाड भागातून येतात. हे सर्व मागील ३ महिन्यांपासून बेपत्ता असून, त्यांची माहिती कोणालाच नाही. बीएमसी त्यांचे टेस्ट रिपोर्ट देण्यासाठी गेले असताना अनेकांच्या घराला कुलूप होते, तर काहींचा पत्ता चुकीचा होता. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले की आम्ही सर्व रुग्णांची माहिती जमा करत असून, लवकरच त्यांना शोधण्याचे काम पुर्ण होणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.