नेपाळची वळवळ पुन्हा सुरू : बिहारच्या पाचशे मीटर जागेवर केला दावा

    दिनांक  22-Jun-2020 13:52:25
|
Nepal_1  H x W:
पाटणा : लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या सीमावादानंतर आणखी काही मुद्द्यांवर भारत-नेपाळ सीमावाद उफाळून आला आहे. नेपाळने बिहारच्या चंपारण क्षेत्र स्थित एका धरणाची दुरुस्ती थांबवली आहे. इथला पाचशे मीटर भूखंडावर आपला दावा केला. नेपाळहून येणाऱ्या ललबकेया नदी (Red Bakaya River) वर बांध पूर्वीपासून आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढणार आहेत.


 
नेपाळने बिहारच्या पूर्व बलुआ गुआबारी पंचायतनजीक लाल बकेया नदीवर सुरू असलेले काम थांबवले आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार हा बांध त्यांच्या जमिनीवर बांधण्यात येत आहे. नेपाळच्या विरोधानंतर बिहार सिंचन विभागाने हे काम तात्पुरता थांबवले आहे. पूर्व चंपारण जिल्हा प्रशासनाने ही माहिती नेपाळ स्थित भारतीय महावाणिज्य दूतावास आणि केंद्रीय गृहमंत्रालय व राज्य सरकारला याबद्दल कळवले आहे. 
 दुरुस्ती करणाऱ्या सिंचन विभागातील अभियंते बबन सिंह यांनी दिेलेल्या माहितीनुसार, लबकेया नदीवरील हा बांध २०१७ मध्ये आलेल्या पूरात वाहून गेला. आता दुरुस्ती करत असताना नेपाळने आक्षेप घेतला. हा बांध थांबवला तर पूर्व चंपारण जिल्ह्यातील ढाका आणि पताही येथे येणाऱ्या पूराला रोखणे संभव होऊ शकते. 


भारताचे सशस्‍त्र सीमा बल (एसएसबी) पूर्व चंपारण जिल्हा प्रशासन अनुसार, हा विवाद भारत-नेपाळ सीमेवर उभ्या केलेल्या पीलर  क्रमांक 345/5 आणि 345/7 या भागातील पाचशे किमी भूखंडावर आहे. नेपाळ जेव्हा जेव्हा अशाप्रकारे आपला दावा करत होता, त्यावेळी दोन्ही देशांचे अधिकारी चर्चेने हा मुद्दा सोडवत मात्र, आता दोन्ही देशांतील तणावामुळे आता असे होणे संभव नाही. सीमावर्ती क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यानुसार, हा विवाद नेपाळच्या भागातून वाढवण्यात येत आहे. नेपाळी ग्रामस्थांनी सीमा दलाच्या जवानांसह वाद केल्याच्याही घटना आहेत. वादात विदेशी शक्तींचा हात असस्याची भीती


ज्या भागात हे काम रोखण्यात आले आहे, तिथल्या गावात तणावात्मक स्थिती आहे. अनेक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. बलुआ गुआबारीचे माजी सरपंच जुलफिकार आलम दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि नेपाळचे शेकडो वर्षांपासूनचे संबंध आहेत. सामाजिक व सांस्‍कृतक संबंध सलोख्यामुळे दोन्ही देशांच्या सीमा कायम खुल्या राहील्या. बांध दुरुस्तीचे काम थांबवल्याने यात कुठल्या परकीय शक्तीचा हात असल्याचे मानले जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.