उपनगरीय रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

Railway_1  H x



तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पश्चिम रेल्वेकडून ३५ शिफ्ट कमी


मुंबई : उपनगरीय लोकल सेवा सोमवार १५ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनकडून करण्यात आला आहे. तिकीट खिडक्यांवरील बुकिंग क्लार्कना कोरोनाची बाधा होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून तातडीने सोमवारपासून प्रवासी आरक्षण केंद्राच्या ३५ शिफ्ट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


२२ जूनपासून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनस येथील तिकीट खिडक्यांवरील बुकिंग क्लार्कच्या शिफ्ट प्रत्येकी तीनने तर विरार आणि अंधेरी येथील कामगारांच्या शिफ्ट दोनने कमी करण्यात येणार आहे. एकूण ३५ शिफ्ट कमी करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.


यासोबतच वांद्रे पुलावरील खिडकीही बंद होणार आहे. पीआरएस केंद्रे आणि यूटीएस काऊंटरची गर्दी कमी करण्यासाठी त्यांच्या टर्नआऊटप्रमाणे डय़ुटी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच वांद्रे स्थानकातील दक्षिण-पूर्व पादचारी पुलावरील खिडकी बेसिक सुविधा नसल्याने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना सर्व सेफ्टी गियर्स पुरविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@