चीनी कंपन्यांशी अद्याप करार रद्द केले नाहीत : ठाकरे सरकार

22 Jun 2020 16:38:15
UT and SD _1  H






मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने केलेला करार अद्याप पूर्णपणे रद्द करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत.


१५ जून २०२० रोजी केलेले हे करार तूर्त जैसे थे ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0