नागपूरची अंतरा मेहता बनली महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट

22 Jun 2020 14:35:39
Antara Mehata _1 &nb





नागपूर : महाराष्ट्राची पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान अंतरा मेहता यांना मिळाला आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात 'फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली. पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या. 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी ठरल्या. अंतरा आता लढाईच्या मैदानात जाण्यासाठी सज्ज आहेत. अंतरा मेहता यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. 
अंतरा यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले तर अभियांत्रिकीचे शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट पूर्ण केले. मग एसएसबीची तयारी केली. त्यांनी हैदराबादच्या डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी 'पिलेटस पीसी-७', दुसऱ्या टप्प्यात त्यांनी 'किरण एमके-१' हे लढाऊ विमान उडवले. शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह १२३ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे 'हॉक्स' या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहता यांचा समावेश झाला आहे. 



नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. "रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याच्या कन्या फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी आहेत.
Powered By Sangraha 9.0