राहुल गांधींबद्दल बोलणाऱ्या सैनिकाचे कुटूंब गायब !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2020
Total Views |
Rahul Gandhi  _1 &nb




नवी दिल्ली : भारत-चीन तणावात अलवर जिल्ह्यातील शिपाई सुरेंद्र सिंह जखमी झाले. त्यांचे पिता बलवंत सिंह यांनी या मुद्द्यावरून कृपया राजकारण करू नका, अशी विनंती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना केली होती. याबद्दलचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. 

परंतू नौगाँवा इथे राहणारे त्यांचे संपूर्ण कुटूंबच आता गायब झाले आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांना काँग्रेसशासित राज्य सरकारमध्ये अशाप्रकारे तोंड लपवून जगण्याची वेळ आली आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस सरकारच्या निर्देशानुसार तिथल्या प्रशासनाने कुटूंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लावला आहे. या सर्व प्रकारावरून संतापलेल्या नेटीझन्सने ट्विटरवर हॅशटॅग चायनीज गांधी, असे म्हणत राहुल गांधीना डिवचले आहे. 

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही काँग्रेसला लक्ष्य करत एरव्ही संविधान बचावाचा नारा देणाऱ्यांच्या राज्यातील एका सैनिक कुटूंबावर आलेल्या नामुष्कीबद्दल टीका केली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकार शासित राजस्थानात राहणाऱ्या या सैनिकांच्या कुटूंबाने केवळ राहुल गांधींनी राजकारण करू नये, अशी विनंती केली. त्यानंतर आता संपूर्ण परिवारच बेपत्ता आहे. बलवंत सिंह यांचा हा व्हीडिओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. 

'दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार एसडीएम, पोलीस आणि प्रशासन जखमी सैनिकाच्या घरी पोहोचले होते. तिथे जवानाच्या कुटूंबियांपैकी आई-वडिल आणि भाऊ या पैकी कुणीच दिसले नाही. घरालाही कुलूप लावले होते. सर्वांचे मोबाईल फोनही बंद ठेवण्यात आले आहेत. सैनिक पत्नी अलवर शहरात दिवाकरी वस्तीत राहत होती. तिचेही घर बंद आहे.सुरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसारच, भारत-चीन संघर्षाबद्दल पहिल्यांदा समजले होते. अलवरचे पोलीस अधिकारी बलवंत सिंह यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. मात्र, आता पोलीसांनाही याबद्दल माहिती नाही, की हा परीवार कुठे गायब झाला आहे.


@@AUTHORINFO_V1@@