देशात बरे झालेल्या रुग्णाची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा ५०,०००हून अधिक

21 Jun 2020 15:17:54

 


covid_1  H x W:

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत २
,२७,७५५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात कोरोनाचे १३,९२५ रुग्ण बरे झाले आहेत. या आजारातून बरे होण्याचा दर ५५.४९ % पर्यंत वाढला आहे.

 



सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १
,६९ ,४५१ असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. मात्र आज कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा ५८,३०५ ने जास्त आहे.चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयन्तांमुळे शासकीय प्रयोगशाळांची संख्या ७२२पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या २५९पर्यंत वाढली आहे (एकूण ९८१ प्रयोगशाळा कार्यरत).


वर्गवारी खालीलप्रमाणे:


जलद आरटीपीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : ५४७ (शासकीय: ३५४ + खाजगी: १९३ )


ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: ३५८ (शासकीय: ३४१ + खाजगी: १७ )


सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: ७६ (शासकीय: २७ + खाजगी: ४९ )


दररोज चाचणी करण्यात येणाऱ्या नमुन्यांच्या संख्येतही वृद्धी झाली आहे. गेल्या २४ तासात १
,९० ,७३० नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत ६८ ,०७ ,२२६ नमुने तपासण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0