पंतप्रधानांनी सांगितले तीन संस्कृत मंत्रांचे महत्व

    दिनांक  21-Jun-2020 11:46:51
|
Narendra Modi_1 &nbs
 
 नवी दिल्ली : आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संदेश दिला. योगदिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जागतिक एकात्मतेचा बंधुत्वचा संदेश देणारा दिवस आहे. कोरोनाच्या संकटात जगाला एक आशादायी आणि उत्साह देणारा योगदिन महत्वाचा ठरला आहे.


योगदिनानिमित्त २१ जून २०१५ रोजी योगदिनाची सुरुवात झाली. यंदाच्या योगदिनाची संकल्पना योगा फॉर हेल्थ, योगा फ्रॉम होम अशी ठेवण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने लेह येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. 
पंतप्रधान मोदी म्हणाले, "सामुहिक कार्यक्रमांपासून दूर रहा. आपल्या कुटूंबासह योगासने करा, जेव्हा परिवार एकत्र येऊन योगसाधना करतो तेव्हा एक वेगळी उर्जा निर्माण होते. कौटूंबिक बंध निर्माण होतो. हा बंध आपल्याला एकमेकांच्या सोबत ठेवतो. कोरोनामुळे योगसाधनेचे महत्व जगात जास्त आहे.

कोरोना आपल्या श्वसन तंत्रावर हल्ला करतो. प्राणायामाद्वारे या तंत्राला मजबूत करतो. प्राणायामामुळे कोरोनाशी लढण्यासाठी बळ मिळते. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, तुम्ही जेव्हा योगगुरुंना भेटाल तेव्हा ते सांगू शकतील. अनुलोम-विलोम, भ्रामरी आदी प्रकारांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.


प्राणायामाचा दररोज अभ्यास करायला हवा, रोजच्या रोज त्याचा सराव करायला हवा. कोरोना महामारीच्या काळात त्याची जास्त गरज आहे. योगसाधनेमुळे आपल्याला वेगळा आत्मविश्वास मिळतो. आपण तणाव दूर करू शकतो. याद्वारे आपण मानसिक संयम शांती आणि सहनशक्ती मिळू शकते.

मोदींनी सांगितली तीन संस्कृत शब्दांचे महत्व

'गीतेत भगवान श्रीकृष्णाने योगाची व्याख्या करत म्हटले ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजे कर्माची कुशलता म्हणजेच योग आहे. समत्वम् योग उच्यते म्हणजे अनुकूलता-प्रतिकूलता, सफलता-विफलता, सुख-संकट या परिस्थितीत समान राहणे, म्हणजे योग आहे.


'युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दुखहा। म्हणजे योग्य आहार, कष्ट-परीश्रम, आपले काम योग्यरीतिने करणे म्हणजेच योग आहे.


वर्ष    संकल्पना

2015 योगा फॉर हारमनी अॅण्ड पीस

2016 कनेक्ट द यूथ

2017 योगा फॉर हेल्थ

2018 योगा फॉर पीस

2019 योग फॉर हार्ट

2020 योगा फॉर होम अॅण्ड योगा फॉर फॅमिली
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.