धक्कादायक ! रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2020
Total Views |

central railway_1 &n
मुंबई : कोरोनामुळे आतापर्यंत रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात मध्य रेल्वेच्या सर्वाधिक ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, उर्वरित कर्मचारी पश्चिम रेल्वेचे आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णांप्रमाणेच मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सामान्य नागरिकांचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत रेल्वेच्याही ५६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे बंद असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे चर्चेत नव्हते. मुंबईत करोनाची लागण झालेल्यांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेबरोबरच पश्चिम-मध्य रेल्वे आणि उत्तर फ्रंटायर रेल्वे कर्मचारीही आहेत. रेल्वे सुरक्षा दल, लोको पायलट, तांत्रिक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली असून या कर्मचाऱ्यांची संख्या ५२० एवढी होती. यातील ३४३ कर्मचारी बरे झाले असून ११२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहेत.


मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. २ जूनपर्यंत मध्य रेल्वेचे १० आणि पश्चिम रेल्वेचे ३ कर्मचारी मृत झाल्याची नोंद होती. मात्र त्यानंतर १९ दिवसांतच मृतांमध्ये झालेली वाढ रेल्वे प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान, ८६ दिवसांनंतर १५ जूनपासून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यासाठी लोकल पुन्हा धावू लागली आहे. परंतु सोशल डीस्टन्सिगचे नियम पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची भीती कामगारांना भेडसावत आहे.
@@AUTHORINFO_V1@@