दिलासादायक : मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३४ दिवसांवर!

20 Jun 2020 17:41:41
mumbai corona_1 &nbs


रुग्णवाढीचा सरासरी दरही दोन टक्क्यांवर

मुंबई : मुंबईत आजही कोविड रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असले आणि चिंतेचे वातावरण असले तरी रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी वाढत असून, मुंबईकरांसाठी ती दिलासादायक बाब आहे. शिवाय रुग्णवाढीचा सरासरी दरही २.०५ इतका घसरला आहे. मात्र उत्तर मुंबईत आर नॉर्थ (दहिसर) विभागात रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त म्हणजे ४.४ टक्के आहे, तर आर मध्य (बोरिवली) विभागात हाच दर ३.८ टक्के आहे. 


आजघडीला मुंबईचा रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ३४ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर एच पूर्व (वांद्रे) विभागाचा कालावधी ७२ दिवसांवर गेला आहे. १ जून रोजी हाच कालावधी १८ दिवसांवर होता, तर १० जूनला २५ दिवसांवर होता. रुग्णवाढीचा सरासरी दरही आज २.०५ टक्के इतका घसरला असून १ जूनला तो ३.८५ टक्के होता, तर १० जूनला २.८५ टक्के होता. एच पूर्व मध्ये रुग्णवाढीचा सरासरी दर फक्त १ टक्के आहे.


ई (भायखळा) विभागात रुग्णदुपटीचा कालावधी ६५ असून रुग्णवाढीचा सरासरी दर १.१ टक्के, तर एफ उत्तर (माटुंगा)मध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६३ दिवस आणि रुग्ण वाढीचा सरासरी दरही १.१ टक्के आहे.


रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांपेक्षा जास्त असलेले विभाग (सरासरी रूग्णवाढीची टक्केवारी)
एम पूर्व ५७( १.२%), एल ५५ ( १.३%), बी ५२ ( १.४%)



४० दिवसांपेक्षा जास्त कालावधी असलेले विभाग
जी दक्षिण आणि बी ४८ (१.४%); जी उत्तर ४५ आणि एम पश्चिम ४५ (१.५%)



Powered By Sangraha 9.0