पाकचे हत्यार तस्करी करणारे ड्रोन पाडण्यात बीएसएफला यश !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2020
Total Views |

bsf_1  H x W: 0
नवी दिल्ली : जम्मूकाश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडले आहे. जम्मू काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यात बीएएसएफने ही कारवाई केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या ड्रोनमधून ७ ग्रेनेड, यूएस मेड एम-४ रायफल, दोन मॅगझिन, ६० राऊंड गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा ड्रोन आकाराने मोठा असून यामधून अली भाई नावाच्या व्यक्तीला या हत्यारांचा पुरवठा केला जात होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
 
 
 
 
 
बीएसएफच्या जवानाना शनिवारी पहाटे ५.१० मिनिंटानी गस्त घालत असताना हा ड्रोन आढळला होता. आंतरराष्ट्रीय सीमेच्या भारताकडील बाजूस २५० मीटरवर भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देंवेंद्रसिंह यांनी ८ राऊंड फायर करत हे ड्रोन पाडले आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर तालुक्यातील रठुआ या गावात बीएसएफने ही कारवाई केली आहे. या ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानातून काश्मीरमध्ये हत्यारे पोहचवण्याचे प्रयत्न सुरू होते. या पूर्वीही अनेकदा भारतीय सुरक्षा दलाकडून कुपवाडा, राजौरी आणि जम्मू सेक्टरमध्ये या पद्धतीच्या हत्यारांच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@