निसर्ग वादळ दोन दिवसांवर, मुंबई महापालिका गाफील !

    दिनांक  02-Jun-2020 14:51:26
|
ashish shelar_1 &nbs

मुंबई : "मुंबईसह कोकण किनारपट्टीला 'निसर्ग' वादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज असल्याने मुंबई महापालिका आपत्कालीन कक्षाचा आढावा मी घेण्यासाठी गेलो तर धक्कादायक चित्र समोर आले. महापालिका कक्ष कोरोनाचे काम करत आहे, मात्र वादळाची कोणतीही तयारी, सूचना, यंत्रणा सतर्क नसल्याचे दिसून आले.", असा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. पालिका प्रशासन मुंबईला वाऱ्यावर सोडणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे.
 
 
'निसर्ग' वादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने कूच करत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीलाही याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन दक्ष असणे अपेक्षित आहे. आशिष शेलार मंगळावारी यांनी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला, तर पालिकेचा हलगर्जीपणा पाहून मला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार किनारपट्टीतील भागांमध्ये दक्षता घेत असल्याचे फेसबूक लाईव्हमध्ये सांगितले होते. सहाजिकच पालिकेनेही दक्ष राहणे गरजेचे होते.मात्र, पालिका कोरोना नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे, असा आरोप आमदार शेलार यांनी केला आहे. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.