हरभजनच्या ट्विटवर चीनी मुखपत्राची आगपाखड !

19 Jun 2020 16:27:40

harbhajan Singh_1 &n
 
 
नवी दिल्ली : सध्या भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. लडाखमधील घुसखोरी आणि गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीमध्ये २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. तर, ४३ चीनी सैनिक मृत्युमुखी पडले. यानंतर आता देशभरामध्ये चीनी वस्तूंवर बंदी घालावी अशी मोहीमच सुरु झाली आहे. यावर हरभजनसिंग यानेदेखील अशा आशयाचे ट्विट केले. मात्र, भज्जीच्या ट्विटनंतर चीनी मुखपत्र असलेले ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्राच्या संपादक ह्यू झिजींगला केलेल्या रुचले नाही.
 
 
 
 
 
चीनी वर्स्तुंवर बहिष्कार घालण्यासंदर्भात हरभजनसिंगने ट्विटमध्ये म्हंटले की, “शरीर आणि राष्ट्र दोघांचे आरोग्य जपण्यासाठी एकच उपाय आहे. 'चीनी बंद'; शरीरासाठी देसी गुड आणि राष्ट्रासाठी देसी गुड्स”. त्यानंतर त्याने सर्व चीनी वस्तूंचा बहिष्कार करा असेदेखील सांगितले.
 
 
 
 
यानंतर ‘ग्लोबल टाईम्स’च्या संपादकाने ट्विटमध्ये सांगितले की, “चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी अनेकजण करत आहेत. त्यात भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचाही समावेश आहे. त्याचे हे वक्तव्य म्हणजे जगासमोर भारतीय संस्कृतीची नकारात्मक छबी पसरवण्याचे काम आहे.” यावरून हरभजनचे ट्विट त्याला चांगलेच झोंबले असल्याचे दिसून आले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0