बहिष्कारानंतरही चीनी मोबाईलची विक्रमी विक्री

19 Jun 2020 18:23:55

Chinese product_1 &n
 
नवी दिल्ली : देशभरातील विविध स्तरावर भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. मात्र काही ठिकाणी याच चीनी वस्तूंची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल कंपनीमध्ये भारतीय ग्राहकांचा अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या चिनी कंपनी वन प्लसची काही मिनिटातच विक्रमी विक्री झाली.
 
 
भारतात चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस ८ प्रो’ या स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला होता. भारतीय ग्राहकांचा अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भरघोस प्रतिसाद मिळाला. सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच हा मोबाईल ‘सोल्ड आउट’ झाल्याचे समोर आले. अॅमेझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर वन प्लस ८ प्रो ५जी या फोनसाठी खास सेल आयोजित करण्यात आला होता. सेलला ठरल्यानुसार दुपारी १२ वाजता सुरूवात झाली, पण हा फोन अॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच सोल्ड आउट झाला.
 
Powered By Sangraha 9.0