"इतकी वर्षे काँग्रेसमध्ये होतो पण सत्तेसाठी लाचार प्रदेशाध्यक्ष पाहिला नाही"

    दिनांक  19-Jun-2020 13:51:20
|
Mahavikas Aghadi_1 &
 
 

'या' नेत्याने केली बाळासाहेब थोरातांवर टीका

मुंबई : राज्याच्या कारभारातील महत्वाच्या निर्णयात विश्वासात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महसूल मंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर गुरुवारी मंत्री अशोक चव्हाणांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता भाजपकडून या प्रकरणी काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी थोरात यांच्यावर टीका केली आहे.मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये होतो, पण सत्तेसाठी लाचार झालेला प्रदेशाध्यक्ष पाहिला नाही. काँग्रेसला सरकारमध्ये असून विचारणारे कुणीही नाही. तरीही लाचार होऊन सत्तेसाठी सरकारमध्ये कायम आहेत. कितीही अवमान झाला तरीही सत्ता सोडतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाही, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.