ऑनलाईन शिक्षणात क्रांती! 'ही' कंपनी करणार १५० कोटींची गुंतवणूक

    दिनांक  19-Jun-2020 20:52:26
|
(L-R) Phalgun Kompalli, R


मुंबई : भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन उच्च शिक्षण कंपनी अपग्रेड पहिल्यांदा 'जामिया हमदर्द'सह बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हे दोन अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन स्वरुपात उपलब्ध करून देणार आहे.


'एमबीए' आणि 'एमसीए' हे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. सरकारमार्फत अनुदानित विद्यापीठ 'जामिया हमदर्द' हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क'नुसार भारतातील आघाडीच्या २५ विद्यापीठांपैकी एक आहे आणि या विद्यापीठाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून 'इन्स्टिट्यूशन ऑफ एमीनेन्स' दर्जा देण्यासाठी लेटर ऑफ इन्टेन्ट देखील देण्यात आले आहे.
'ऑफलाईन बेसकॅम्प्स' आणि 'लाईव्ह क्लासेस' सहित ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करवून देणारी भारतातील एकमेव एडटेक कंपनी असलेल्या अपग्रेडने ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीसोबत भागीदारी केल्याचीही घोषणा केली. कॉर्पोरेट आणि फायनान्शियल लॉ विषयात १ वर्षाचे एलएलएम आणि दोन वर्षाचा डिजिटल फायनान्स आणि बँकिंगमधील एमबीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ नुसार जेजीयू हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे खाजगी विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आयओई दर्जा देण्यात आलेला आहे.


अपग्रेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि सह-संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी ही घोषणा करताना सांगितले, "सध्या संपूर्ण जगात उद्भवलेल्या संकटकाळात नियमितपणे विकास करत राहणे गरजेचे आहे, खासकरून ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव आणि पोहोच वाढवण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. अपग्रेडमध्ये आम्ही बदलत्या परिस्थितीसोबत सदैव विकसित होण्याची आणि अधिकाधिक चांगल्या शिक्षण सुविधा तयार करण्याची ग्वाही देतो. आमचा पदवी पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी सक्षम करतो, यामध्ये त्यांना ऑफलाईन शिक्षण प्रणालीवर उद्भवलेल्या संकटाबाबत विचार करण्याची अजिबात गरज उरत नाही." 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाईन शिक्षणाचे समर्थन केल्यानंतर काही आठवड्यातच ही घोषणा केली. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जामिया हमदर्द विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रोफेसर (डॉ.) सय्यद एहतेशाम हसनैन, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे संस्थापक उपकुलगुरू आणि जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर (डॉ.) सी राज कुमार, आईआईआईटी-बी चे संचालक प्रोफेसर एस सदगोपान आणि अपग्रेडचे तीन सह-संस्थापक उपस्थित होते. उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये २०२२ पर्यंत ४१ मिलियन विद्यार्थी दाखल होतील असे अनुमान आहे, या क्षेत्रामध्ये अपग्रेडने आपल्या नवीन उद्योगासाठी १५० कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.अपग्रेडचे सह-संस्थापक व एमडी श्री. मयांक कुमार व सह-संस्थापक श्री. फाल्गुन कोमपल्ली यांनी सांगितले, "विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी अपग्रेडमध्ये आम्ही त्रिस्तरीय दृष्टिकोन वापरत आहोत. पदवी अभ्यासक्रम सुरु करून अपग्रेड नवे पदवीधर आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपापल्या घरी सुरक्षित वातावरणात पदवीचा अभ्यास करण्यासाठी सक्षम करेल.


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अपग्रेडमध्ये सशुल्क प्रोग्रॅम्स आणि मोफत सर्टिफिकेशन कोर्सेस दिले जात आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्यापाशी असलेल्या अतिरिक्त वेळेचा लाभदायक उपयोग करून घेता येईल कारण येत्या काळात काही महिने फक्त सर्वात आघाडीच्या लोकांनाच नोकऱ्यांमध्ये घेतले जाईल. ऑफलाईन महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी आम्ही अपग्रेड लाईव्ह प्लॅटफॉर्म, एलएमएस (लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम) चा संपूर्ण ऍक्सेस दिला आहे जेणेकरून ते काहीही खर्च न करता संपूर्णपणे ऑनलाईनमध्ये येऊ शकतील. यासाठी ५० पेक्षा जास्त संस्था आमच्यासोबत आल्या आहेत."आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यासारख्या भविष्यात खूप उपयोगी पडतील अशा विषयांना सर्वांसाठी सहजसुलभ बनवण्यासाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उपक्रमाद्वारे अपग्रेडला निवडले गेले आहे. कंपनीच्या प्रोग्राम्सना राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यासोबत अपग्रेडचा पीजी डिप्लोमा इन डेटा सायन्स हा भारतातील पहिला असा पीजी डिप्लोमा आहे ज्याला नॅसकॉम फ्युचरस्किल्सने मान्यता दिली आहे. आपल्या प्रोग्राम्सना सतत विकसित करत अपग्रेड विद्यापीठांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात सक्षम करून आणि ऑनलाईन शिक्षणाला मुख्य प्रवाह बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.