‘निसर्ग’चा तडाखा बसलेल्यांना पृथ्वीचा मदतीचा हात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2020
Total Views |

prithvi shaw_1  
मुंबई : अवघ्या काहीच दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा जोरदार तडाखा बसला. महाराष्ट्रामध्ये अलिबाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील अनेक गावे या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली. कोकणातील अनेक गावांमध्ये नागरिकांची घरे वादळामुळे उद्धस्त झाली. अशामध्ये आता भारतीय संघाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिबागकरांसाठी धावून गेला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये घरे उद्वस्थ झालेल्या नागरिकांना त्यांची घरे पुहा उभी करण्यास तो मदत करत आहे.
 
 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ हा अलिबागमधील संजय पोतनीस यांच्या बंगल्यामध्ये अडकलेला आहे. अलिबागमधील धोकावडे गावातील फार्महाऊसमध्ये सध्या त्याची सोय केली असून त्याच्यासोबत संजय पोतनीस यांचा मुलगादेखील तिथे अडकलेला आहे. एका वृत्तपत्राला शिवसेनेचे नेते संजय पोतनीस यांनी माहिती दिली की, “लॉकडाउनमध्ये माझा मुलगा आणि पृथ्वी शॉ फार्महाऊसमध्ये अडकला आहे. निसर्ग चक्रीवादळामध्ये माझ्या फार्महाऊसचेही थोडे नुकसान झाले. अनेक घरांचे यामध्ये नुकसान झाले, काहींच्या घरावरची छपर, पत्रे उडून गेले. गावकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून यश आणि पृथ्वीने त्यांची मदत करायचे ठरवले. पृथ्वीने काही जणांच्या घरावरची छपरे चढवण्यास मदत केली, काही जणांना त्याने आपले घर पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदतही केली.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@