बहिष्कार टाळण्यासाठी चीनची ‘नावात’ बनवाबनवी!
दिल्ली : चीनच्याविरुद्ध भारतात उसळलेल्या संतापाच्या लाटेचा फटका आता चीनला बसू लागला आहे. अनेक दुकानदारांनीही चिनी उत्पादने विकणे बंद केले आहे. भारतात शासकीय व्यवस्थेतल्या चीनी उपकरणांवरही केंद्र सरकारने बंदी घातली. सर्वसामान्यही आता ‘मेड इन चायना’ गोष्टी घे टाळत आहेत. यावर चीनने बनवाबनवीचा मार्ग वापरणे सुरू केले आहे. चिनी उत्पादनांवर ‘मेड इन चायना’ ऐवजी ‘मेड इन पीआरसी’ लिहू लागला आहे. ‘मेड इन पीआरसी’ मधला ‘पीआरसी’ म्हणजे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणजे चीन !
२०१७मध्ये चीनने डोकलाममध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारतात चीनच्या विरुद्ध निर्माण झालेल्या संतापानंतर चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली होती. पण, डोकलामचा वाद जीवहानी न होता मिटला त्यामुळे ती मोहीम फार तीव्र झाली नाही पण चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणारा देशातील जागृत वर्ग वाढला.
१५ जूनला गॅल्वानच्या खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झल्यानंतर भारतात पुन्हा चीनविरुद्ध संतापाची तीव्र लाट उसळली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका चीनला बसणार असे संकेत दिसत आहेत. दरम्यान, चीनने डोकलामनंतरच्या भारतातील चीनी उत्पादनांवरील बहिष्काराच्या मोहिमेत भारतीयांची दिशाभूल करण्यासाठी चीनच्या उत्पानांवर ‘मेड इन चायना’ ऐवजी ‘मेड इन पीआरसी’ लिहिणे सुरू केले.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ‘मेड इन पीआरसी’ म्हणजे ‘मेड इन चायना’हे माहीतच नव्हते! आपण चीनी समान नको म्हणून ‘मेड इन चायना’ लिहिलेले उत्पादन घेत नाही, पण ‘मेड इन पीआरसी’ लिहिलेले समान आपण काहीही विचार न करता घेतो. काही वेळेस विक्रेत्याकडून ‘मेड इन पीआरसी’ म्हणजे ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हणजे चीन याचा खुलासा केला जातो, मात्र काही विक्रेते मुद्दाम असा उल्लेख करणे टाळतात. या संदर्भात आणखी उल्लेखनीय म्हणजे चीनी उत्पादने भारतीय वाटावीत म्हणून त्यावरील चित्रांमध्ये भारतीय लोकांची चित्रे वापरली जात आहेत. बऱ्याच वस्तूंवर तपशील हिंदीतही छापला जात आहे. चिनी उत्पादनांना भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न चीनकडून केला गेला आहे.