चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज ; सीमेवर युद्धजन्य परिस्थिती

18 Jun 2020 12:29:28

indian troops_1 &nbs




नवी दिल्ली
: पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५-१६ जून रोजी मध्यरात्री झालेल्या संघर्षात भारतीय लष्करातील २० जवान  शहिद झाले. त्यानंतर भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर भारत आणि चीनमध्ये बोलणी सुरूच आहे. चीन एकीकडे ते शांततेबद्दल बोलत असताना दुसरीकडे त्यांनी गॅलवान खोऱ्यावर दावा करत आहे. भारताने देखील आपल्या निर्णयावर ठाम राहत चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आल्याचे सांगितले. या घटनेनंतर चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.


प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारताच्या सीमा व्यवस्थापनासाठी शांतता राखण्याचे धोरण बदलले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्याचवेळी, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)कडे परत जाण्याचे पर्याय देखील संपले आहे. भारतीय सैन्य सध्या ३४८८ कि.मी. एल.एल.सी. आणि पूर्वेकडील सर्वोच्च स्थानावर तैनात आहे. चीनने एल.ए.सी. वर विशेषतः गलवान, बेग ओल्डि, देपासंग, चुशुल आणि पूर्व लडाखच्या इतर भागातही आपली सैन्यबळ वाढवले ​​आहे. यावरून असे दिसते आहे की भारतीय सैन्य युद्धासाठी सज्ज आहे. लद्दाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत एलएसीवर कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवरील १५ हजार सैन्य तैनात आहे.

भारत आणि चीनमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे ४३ हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवानांच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने लष्कराचे ट्रक लडाख सीमेजवळ जाताना दिसले आहेत. चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी चारही बाजुने घेरले जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर, लडाखमध्ये भारत बांधत असलेल्या रस्त्याचा वेगही वाढविण्यात आला आहे. भारताच्या या रस्ता बांधकामाला चीनचा विरोध आहे. कारण, यामुळे भारतीय लष्कराला सीमेवर जाणे सोपे होईल आणि हेच चीनला नको आहे. सीमेवर सध्या तणाव असला तरीही रस्ता बांधकाम कामाला आणखी गती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यासाठी जवळपास १५०० कामगार सुद्धा लडाखला रवाना झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात काही कामगार परत आले होते, पण आता त्यांना परत पाठविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0