भारतातील चीनी हॉटेल्स बंद करा ! चायनीज खाणे बंद करा : आठवले

    दिनांक  18-Jun-2020 14:26:19
|
Ramdas Athwale _1 &n
 
 केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री व रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही चीन विरोधात सूर आळवला आहे. चीनी अन्नपदार्थ खाणे बंद करा, भारतातील चीनी उत्पादने, वस्तू आणि हॉटेल्सही बंद करा, अशी मागणी मंत्री आठले यांनी केली आहे. चीन हा धोका देणारा देश आहे, तिथल्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. 
 
 
भारताच्या हद्दीत घुसून चीनने लडाखच्या गलवान व्हॅली येथे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. चीनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर भ्याडपणे पूर्वनियोजित हल्ला केला. यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. संपूर्ण देशभरातून चीनविरोधात संताप व्यक्त केला जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही चीनविरोधात वक्तव्य केले आहे. देशभरात अनेक ठिकाणी चीनी वस्तूंची होळी केली जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.