आमच्यातील वाद मीडियाने मोठे केले : बाळासाहेब थोरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2020
Total Views |
BalasahebThorat_1 &n



मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात वेळ मिळत नसल्याचा बातम्या चालवून महाविकास आघाडीत वाद आहेत, हे दाखवत आमच्यातील मतभेद मोठे करण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमांनी केला, अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. आमच्यात कुठलाही वाद नाही, सर्व बाबींवर सकारात्मक चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी या वादंगाबद्दल शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तूनही टीका करण्यात आली होती. 



नाराज काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज दुपारी दीड वाजताची वेळ मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याने या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. गेल्या काही दिवसांपासून वेळ मिळत नसल्याने काँग्रेसने टीकाही केली होती. तसेच तीन भावंडांमध्येही मतभेद असतात आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे, असे खुद्द बाळासाहेब थोरात म्हणाले होते. आज चर्चेनंतर मात्र, त्यांचा सुर काहीसा मावळला होता. 




कोरोनाच्या संकटात आपण महाविकास आघाडीतील आपली भूमीका मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. ही चर्चा व्यक्तीगत पातळीवर नव्हती, न्याय योजना राज्य पातळीवर मांडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव ठेवला नाही, कोकणातील निसर्गग्रस्तांच्या मदतीसाठीही आम्ही चर्चा केली. राज्यातील मजूरांच्या दृष्टीने मदत करता येईल का याबद्दल आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.





@@AUTHORINFO_V1@@