भारत-चीन संघर्ष : तणावाच्या स्थितीवर अमेरिकेचे बारकाईने लक्ष

17 Jun 2020 14:45:57

USA_1  H x W: 0




वाशिंग्टन :
भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही ४३सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. भारत आणि चीनदरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.


प्रतिक्रिया देताना अमेरिकेने म्हटले आहे, लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चीनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय लष्कराने मंगळवारी एक निवेदन जारी करून गलवान खोऱ्यात २० जवानांना हौतात्म्य आल्याचे सांगितले होते. आम्ही त्यांच्या कुटूंबियांप्रती शोक व्यक्त करतो.अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते, की भारत आणि चीन दोघांनीही डी-एस्कलेट करन्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आम्हीही सद्य स्थितीत शांततापूर्ण मार्गाचे समर्थन करतो. ट्रम्प आणि पीएम मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर फोनवरून चर्चा केली आहे.
Powered By Sangraha 9.0