आंध्रप्रदेशात नदीत आढळले दोनशे वर्षे जूने शिवमंदीर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020
Total Views |
SHiv-Temple_1  




नेल्लोर : आंध्रप्रदेशच्या नेल्लोर भागातील पेरूमलापाडू गावात पेन्ना नदीच्या तळाशी एक मंदीरासारखी आकृती आढळली आहे. इथे दोनशे वर्ष जूने शिव मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. या भागाची सविस्तर तपासणी केली जाणार असून पुढील काळात याबद्दलचे अधिक पुरावे प्राप्त होऊ शकणार आहेत. जर ठोस पुरावे आढळले तर येत्या काळात हे मंदिर संग्रहीत केले जाणार आहे.




एंडोस्मेंट असिस्टेंट कमिश्नर वि. रवीन्द्र रेड्डी यांनी दिलेल्या, स्थानिकांनी या मंदिराच्या नुतनीकरणाची मागणी केल्याचे म्हटले आङे. यापूर्वी ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे नयागड जिल्ह्यात महानदीत पाचशे वर्षे जूने गोपीनाथ मंदिराचे अवशेष आढळले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षांपूर्वी या मंदिराचा भाग दर्शनास आला होता. आता पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा दर्शन झाले आहे. 





गोपीनाथ मंदिराचा अग्र भाग दिसल्यावर INTACH महानदीचा किनारा आणि भूभाग पुरातत्व विभागाच्या नोंदणीचा हिस्सा बनला आहे. एका गावकऱ्याच्या मते, त्यांचे संपूर्ण गाव हे १९३३मध्ये नदीत बुडाले होते. त्यावेळी त्याचे वय सहा वर्ष इतके होते. त्यांच्यासह पाच भावंडांनी एका शाळेत आसरा घेतला होता. त्यावर्षी नदीचा प्रवाह बदलल्याने आलेला पूर सर्वांचा काळ बनला होता.




प्रकल्पाच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडीसामध्ये अशी बरीचशी मंदिरे आहेत. जी पाण्याखाली गेली आहेत. हीराकुद जलभंडारात ६५ मंदिरांचा सामावेश आहे. त्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. काही मंदिरे उभी आहेत. काही मंदिरांचे अवशेष वाहून गेले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@