झटापटीत पाच चीनी सैनिकांचा मृत्यू ! - चीनने लपवली माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020
Total Views |
CHina _1  H x W






ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टरनेच केले होते ट्विट

बिजिंग : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाख सीमेवरील गलवान घाटीत हिंसक झडपेत दोन्ही सैन्यदलातील जवानांनी आपले प्राण गमावले असल्याचे वृत्त आहे. मात्र, चीनी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने ही बाब लपवत अस्पष्ट वृत्तांकन सुरूच ठेवले आहे. कुठल्याही प्रकारे चीनी सैन्यदलाच्या जवानांचा मृत्यू झाल्याचे वृत्त बाहेर येऊ न देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारतीय सैन्यदलाच्या दोन जवानांनी बलिदान दिल्यानंतर याबद्दल वृत्त दिले. या झटापटीत दोन्ही देशांच्या सैन्यदलाची हानी झाली आहे.


ग्लोबल टाईम्सच्या एका रिपोर्टरने भारत-चीन सीमेवर पाच पीएलए सैनिक मृत आणि ११ जखमी झाल्याची माहिती दिली, यानंतर काही काळाने ग्लोबल टाईम्सने ट्विट करत आम्ही या घटनेबद्दल अधिकृतरित्या स्पष्टतादेत नाही, असे म्हटले. काही वेळाने ग्लोबल टाईम्सच्या संपादकाने ट्विट केले, "मला माहिती असलेल्या आधारावर एक गोष्ट सांगू इच्छितो की चीनी सैन्यदलाचेही झटापटीत नुकसान झाले आहे. मी भारतीय पक्षकारांना सांगू इच्छितो यावर अभिमान बाळगण्याची गरज नाही चीनच्या संयमाला चुकीचे समजू नका. चीन भारताशी कुठल्याही प्रकारची चकमक करू इच्छित नाही, याचा अर्थ आम्ही घाबरलो असे नाही.


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले की, आम्ही वार्ता करण्यासाठी तयार आहोत. अक्साई चीन सीमेवर झालेल्या झटापटीत दोन भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर सीमेवर तणाव वाढला. यात कुठलाही गोळीबार झाला नसला तरीही दोन्ही बाजूने दगडफेक झाली. चीनी सैनिकही यात जखमी झाल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे. चीनचे पाच सैनिक मारले गेले आहेत. मात्र, चीनी प्रपोगंडा तंत्र ज्या प्रकारे खोटी माहिती पसरवण्यासाठी आक्रमक आहे, त्यानुसार ही बातमीही ते बाहेर पडू देणार नाही. उलट भारतीय सैन्य त्यांच्या हद्दीत घूसण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा चीन करत आहे. भारत नेहमी शांतीप्रिय देश म्हणून ओळखला जातो. मात्र, चीनच्या कुरापती गेल्या काही दिवसांपासून साऱ्या जगाने पाहिल्या आहेत. अक्साई चीन येथे गलवानमध्ये महिनाभरापासून चीनी सैन्य तळ ठोकून आहे.




भारत तयार करत असलेल्या रस्त्यामुळे हा वाद उफाळून आला. भारत गलवान घाटाच्या डुरबुकहून दारूल बेग ओल्डपर्यंत रस्ता बनवण्याचे काम करत आहे. हा भाग चीनचा असल्याचा दावा चीनने केला आहे. दारूल बेग ओल्ड हा भारताच्या अक्साई चीनच्या भागात आहे. यावर चीनने कब्जा केला आहे. गलवान क्षेत्र या संपूर्ण भागातील सर्वात उंच क्षेत्र आहे. भारतीय सैन्याचे जवान इथे रसद पोहोचवतात उत्तरेकडे दौलत बेग ऑल्डी सेक्टर आहे हा भारतीय सीमेतील भाग आहे. इथेही चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला.
@@AUTHORINFO_V1@@