१९६२मध्येही चीनने केला होता भारताचा विश्वासघात ; गॅल्वान खोऱ्यात झाले होते युद्ध

    दिनांक  16-Jun-2020 14:56:07
|

gallen_1  H x W
नवी दिल्ली :
चीन  आणि भारत यांच्यात तणाव वाढला आहे. सोमवारी रात्री पूर्वेकडील लडाखच्या गॅल्वान खोऱ्यात सैन्याने माघार घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही बाजूंनी हिंसक चकमक उडाली. त्यात भारतीय लष्कराच्या एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. हे तेच गॅल्वान खोरे आहे जिथे चीनने भारताचा विश्वासघात केला होता आणि १९६२मध्ये युद्ध सुरू झाले.गॅल्वान खोरे हा लडाखचा प्रदेश आहे. इथूनच गॅल्वान नदी वाहते. १९६२मध्ये दोन्ही देशांमधील युद्धात इंडो-चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. चिनी सैन्याने नेहमीच वादग्रस्त भागात तंबू टाकून भारताला चिथावणी दिली आहे. अलीकडेच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तसे करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने सर्व बाजूने चीनला रोखले, यावरुनच दोन्ही सैन्यात संघर्ष झाला आहे. याच खोऱ्यात ५८ वर्षांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात युद्ध झाले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दोघांमधील तणाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांनी हा वाद चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निकाल लागला नाही.चिनी माध्यमांद्वारे चीनच्या संरक्षण सीमेवर भारताकडून बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा आरोप होत असून तो पूर्णपणे असत्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने असे म्हटले आहे की, चिनी सैनिक या भागात तंबू उभारून आम्हाला चिथावणी देणारे उपक्रम करीत आहेत. त्याचवेळी भारतीय अधिकारी आणि दोन सैनिकांच्या शाहिद होण्याने आता तणाव वाढत आहे. परिस्थिती सामान्य करण्यासाठी दोन्ही बाजूचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सध्या बैठक घेत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी यासंदर्भात बैठक घेतली. भारत आणि चीनमधील सीमा विवाद जवळपास महिनाभरापासून सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून चर्चेतून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.