शोपियांत चकमकीदरम्यान भारतीय जवानांकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा!

16 Jun 2020 09:32:14

shopian_1  H x

दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त; हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याची शक्यता

जम्मू-काश्मीर : शोपियां जिल्ह्यातील तुर्कवांगम भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून मंगळवारी पहाटे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने दोन AK-47 आणि एक INSAS जप्त केले आहे. याठिकाणी अजूनही शोधमोहीम सुरू आहे. १६ जून रोजी पहाटे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलातर्फे शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत तीन अज्ञात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. हे सर्व स्थानिक दहशतवादी असून ते हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित होते असे अंदाज आहेत.

 
तिन्ही दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव झुबैर असे असून तो दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा शोपियांमधील कमांडर असल्याची शक्यता आहे. तर झवूरा येथील कामरान मिन्हास आणि मुन्नेद उल इस्लाम अशी अन्य दोघांची नावे असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. सीमेवर पाकिस्तानकडून सतत कुरघोड्या सुरु असून, या कुरघोड्यांना भारतीय सैन्याकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

Powered By Sangraha 9.0