दापोलीच्या तहसीलदारांचा माज ! वादळग्रस्त ग्रामस्थांना केली दमदाटी

15 Jun 2020 19:30:37
Tweet _1  H x W
 
 
 
 

दापोली : कोरोनानंतर 'निसर्ग' वादळाचा फटका बसल्यानंतर आता कोकणवासीयांना प्रशासकीय जाचाला सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय पथकाची भेट घालून द्या, अशी विनंती करणाऱ्याच्या अपेक्षेने गेलेल्या ग्रामस्थांवर तहसिलदार धावून आल्याचा व्ही़डिओ व्हायरल झाला आहे. 'लिगल राईट्स ऑब्झवेटरी' (Legal Rights Observatory) या ट्विटर हॅण्डलद्वारे हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
 


 
 
आधी कोरोनामुळे व आता निसर्ग वादळामुळे दापोलीसह अन्य तालुक्यातील पर्यटन व्यवसाय ठप्प गेले काही दिवस कोरोनामुळे पर्यटक कोकण परिसरात फिरकले नसल्याने सारंकाही ठप्प आहे. पर्यटन व्यवसायाला नुकत्याच झालेल्या निसर्गचक्रीवादळामुळे मोठा फटका बसला. दापोली परिरातील कर्दे, हर्णै, आंजर्ले आदी भाग एप्रिल-मेच्या हंगामात पर्यटकांनी फुललेला असतो. मात्र कोरोनामुळे यावेळी पर्यटकच फिरकले नाहीत.
 
 
 
३ जूनला झालेल्या चक्रीवादळामुळे येथील पर्यटक, व्यावसायिक कोलमडून पडले आहेत. दापोली तालुक्यातील बरेचसे रिसॉर्ट समुद्रकिनारी आहेत. निसर्ग वादळचा तडाखा या रिसॉर्टना बसला असून अनेक रिसॉर्टचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय हे सर्व दुरूस्त करण्यातही मोठा कालावधी जाणार आहे. यामुळे सध्या तरी या भागातील पर्यटन व्यवसाय अतिशय अडचणीत आला आहे.
 
 
 
 
 
या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक इथे पाहणीसाठी येणार आहे. दरम्यान पथकाच्या भेटीदरम्यान आम्हाला वेळ मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. तहसीलदाराकडे या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते. या प्रकाराचा व्हीडिओ काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तहसीलदाराने मोबाईल फोन खेचून घेतला. आधीच संकटात असेल्या ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Powered By Sangraha 9.0