गुडुची... रोगप्रतिकारकशक्तीसाठी !

    दिनांक  15-Jun-2020 22:03:09
|


guduchi_1  H xसध्या कोरोना या घातक विषाणूच्या प्रादुर्भावापासून तसेच इतर संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल, तर बाह्यउपायांबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं आणि टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि त्यासाठी काही आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूने जगभरात कहर केल्यानंतर आता प्रत्येकजणच निरोगी आरोग्यासाठी धडपडतो आहे. पण, आपले आरोग्य चांगले ठेवणे हे आपल्याच हाती आहे. अनेकदा आरोग्याशी निगडित अनेक साध्या-सोप्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. त्यातलीच महत्त्वाची आणि सहज दुर्लक्षित होणारी एक गोष्ट म्हणजे, आपली ‘रोगप्रतिकारकशक्ती.’ जिच्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. सध्या कोरोना या घातक विषाणूच्या प्रादुर्भावापासून तसेच इतर संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल, तर बाह्यउपायांबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं आणि टिकवून ठेवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि त्यासाठी काही आयुर्वेदिक वनस्पतींचे सेवन करणे गरजेचे आहे. शासनाच्या ‘आयुष’ मंत्रालयानेसुद्धा विविध आयुर्वेदिक औषधांचे सेवन करण्याचे निर्देश दिले आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात अनेक वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी प्रामुख्याने ‘गुडुची’ ही वनस्पती रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी सर्वोत्तम असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणूनच या बहुउपयोगी आणि बहुगुणी ‘गुडुची’ वनस्पतीची ओळख तुम्हाला करुन देणार आहोत.


गुळवेल-गुडुची म्हणजे नक्की काय?


कडुनिंब, आंबा, शेंड वा अन्य झाडांवर वाटोळी घेत वर चढत गेलेली हृदयाच्या आकाराची पाने असलेली वेल तुम्ही पाहिली असेल, तीच गुडुची वा गुळवेल होय! या गुळवेलीला संस्कृतमध्ये ‘गुडुची’ असे म्हणतात. तिला अनेक पर्यायी नावेसुद्धा आहेत. जसे ‘अमृता नमृतमस्या’ या शब्दापासून ‘अमृता’ हे नाव पडले आहे. ‘अमृता’ म्हणजेच अमृतासमान असणारी, जी खाल्ली असता वा जिचे सेवन केले असता मृत्यू येत नाही. ‘रसायना’ म्हणूनही तिला संबोधले जाते. रसायना म्हणजेच ही शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी, सदा तारुण्य कायम राखणारी आहे, तर उत्कृष्ट ज्वरनाशक असल्यामुळे तिला ‘ज्वरारी’देखील म्हटले जाते. महाराष्ट्रात सगळीकडे ही वनस्पती आढळते. गुडुचीला विशिष्ट वास नसतो, पण चव खूप कडू असते. आयुर्वेदात या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदात ‘गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ’ असा उल्लेख या वनस्पतीबाबत केलेला आढळतो. वर्षानुवर्ष ही वनस्पती विविध दुर्धर आजारांवर आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उत्तम औषध असल्याचे वैद्यांच्या चिकित्सा संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे. गुडुचीची पाने, खोड आणि कंद फारच औषधी असते. यामध्ये अनेक ‘अ‍ॅण्टिऑक्सिडंन्ट्स’ आणि ‘अ‍ॅण्टिबॅक्टेरीअल’ गुण असतात. कॉपर, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटिन, झिंक, मॅग्नेशियम आणि मिनरल्स हे घटक आढळतात. याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. या अनोख्या गुणधर्मांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात गुडुचीचे शरीरासाठी असलेले फायदे.pitambari 2_1  


प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी


गुडुची तुमच्या शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. गुडुचीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरीन आम्ल, टिनोस्पोरीन गिलोइन ही रासायनिक गुणद्रव्यंही आहेत. ही रसायने चवीला कडू असली तरीदेखील हे घटक उत्तम अ‍ॅण्टिव्हायरल आहेत. ही रसायन द्रव्ये सामान्यत: संसर्गावर मात करणार्‍या पेशींवर काम करतात. ज्यामुळे शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या वाढते. या पांढर्‍या पेशी आपल्या शरीरावर हल्ला करणार्‍या जंतूंना, विषाणूंना प्रभावीपणे लढा देतात. त्यामुळे होणार्‍या व्हायरल अटॅकपासून शरीराचे रक्षण होते. आपण जर बघितलं तर ‘कोविड-१९ ’मध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आदी लक्षणे दिसून येतात. ही सर्व लक्षणे आयुर्वेदानुसार वात व कफाशी संबंध दाखवतात आणि गुडुची वनस्पती या दोन्ही दोषांचे शमन उत्कृष्ट पद्धतीने करते. गुडुचीमध्ये सप्तधातू वर्धन करण्याची शक्ती आहे. त्यामुळे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शु या सात धातूंची वृद्धी झाली की शरीरामध्ये आपोआपच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. आयुर्वेदानुसार ‘कोविड’सारख्या आजारांमध्ये रस धातू दूषित होतात. त्यामुळे धात्वाग्नी मंद होऊन नंतर प्राणवह स्त्रोतसही दूषित होते व पर्यायाने वात व कफ या दोघांमध्येही दूषितीकरण होते. परंतु, गुडुची ही त्रिदोषशामक असल्याने वात व कफाचे शमन करण्यातसुद्धा उपयुक्त आहे. यातील औषधीय घटक तुमच्या शरीराला स्वच्छ करतात व शरीरातील दूषित घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे आजारपणामध्ये शरीराची झालेली हानी भरुन काढण्यासाठी तसेच कुठल्याही आजारातून उठल्यावर रुग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देऊन रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यात गुडुची अत्यंत परिणामकारक आहे. वेगवेगळ्या रिसर्च पेपर्समध्येसुद्धा तज्ज्ञांद्वारे गुडुचीचा प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठीचा उपयोग वारंवार सिद्ध करण्यात आला आहे.सर्दी-पडसे, तापाच्या उपचारात उपयोगी


कोणत्याही प्रकारच्या तापावर गुडुची हा रामबाण उपाय आहे. तापाच्या विकारात जी थंडी वाजून येते ती थंडी गुडुचीच्या काढ्याने बंद होते. जीर्ण तापात अंगावर काटा येत असल्यास गुडुचीचा चांगला उपयोग होतो. गुडुचीच्या खोडाचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास अशक्त रुग्णांना वारंवार होणारी सर्दी-पडसे तसेच तीव्र तापासारखे आजार बरे होतात. चिकनगुनियासारख्या व्हायरल तापात गुडुचीच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो. डेंग्यूसारख्या आजारात तीव्र तापामुळे शरीरातील पांढर्‍या पेशी (प्लेटलेट्स) मोठ्या संख्येने कमी होतात. त्यामुळे रुग्णाचा जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते. अशावेळी गुडुचीच्या रसाचे सेवन केले, तर डेंग्यू होण्यापासून बचाव करता येतो. लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि तापात गुडुचीच्या पानांचा रस काढून तो दोन-तीन वेळा मधाबरोबर चाटण करुन दिल्यास लगेच फरक पडतो. आपण आता ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराच्या संक्रमणातून प्रवास करत आहोत. यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसतात. कोविडचे संक्रमण रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास पटकन होते. तसेच वरील लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यासाठी गुडुची घेणे फायदेशीर ठरते. वात व कफ दोषाचे शमन व रोगप्रतिकारकशक्ती वृद्धी वरील लक्षणांमध्ये गुडुचीच्या सेवनाने आराम मिळताना दिसतो.विविध दुर्धर आजारांवर मात करण्यास फायदेशीर

चिंता, मानसिक तणाव आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टींचा वाईट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होत असतो. गुडुचीच्या सेवनामुळे भूक वाढते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. परिणामी तुमची पचनक्रिया सुलभ होते. हृदयाचे रक्ताभिसरणही सुधारते. त्यामुळे हृदयावर होणारे दुष्परिणाम टळून हृदय बळकट बनते. गुडुचीमुळे यकृताचे कार्यही चांगले राहून, आपले आरोग्य सुधारते. याशिवाय अनेक आजारांवर गुडुची अतिशय उपयुक्त आहे.


मधुमेही रुग्णांना विशेष फायदा


मधुमेहातील एका प्रकारात इन्सुलिन सिक्रीशन कमी झाल्यामुळे रक्तातील साखर वाढत असते. अशावेळेस वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम गुडुची करते. त्याचप्रमाणे वाढलेल्या साखरेमुळे शरीरामध्ये किडनी व हृदय या अवयांवरतीसुद्धा ताण येत असतो. हा ताण कमी करण्याचे कामही ती करते. तसेच या सर्व गोष्टींमुळे मधुमेही रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यासाठी सुद्धा गुडुची काम करते. गुडूचीचा रस काढून दररोज प्यायलास शरीरातील साखरेचे प्रमाण घटत जाते. परिणामी रक्तदाबाच्या ताारीही दूर होतात. त्यामुळे गुडुची औषधीला रक्तशर्करा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पूरक तत्त्व मानले जाते. तरी, गुडुचीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला निश्चित घ्या.


असे करा गुडुचीचे सेवन

१) गुडुचीचा काढा करण्यासाठी एक कप गुडुची घेतल्यास त्याच्या दोन ग्लास पाणी घेऊन हे मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडूसर असला तरी अत्यंत गुणकारी आहे.


२) थोडीशी सर्दीची सुरुवात झाल्यास रिकाम्यापोटी गुडुची मध अथवा गरम पाण्यासह घेतल्यास उपयुक्त आहे.


३) तुपाबारोबर गुडुची घनव़टी घेतली तर वातशमन करायला व मधाबरोबर घेतली तर कफाची दुष्टी कमी होण्यास उपयोग होतो.


४) सध्याच्या धावपळीच्या युगात गोळ्या अथवा कॅप्सुलचे सेवन करणे अधिक सोयीस्कर ठरते. त्यामुळे अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गुडुची वनस्पतीच्या सत्वातून ‘गुडुची टॅबलेट’ तयार केल्या आहेत. या गोळ्यांमधून गुडुचीची कार्यकारी तत्त्व जशीच्या तशी मिळतात. तेव्हा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ‘पितांबरी’ची ४००मिली ग्रॅमची गुडुची टॅब्लेट उपयुक्त ठरणार आहे. गुडुची टॅब्लेट पाण्याबरोबर घेता येईल. तसेच प्रवासातही सोबत ठेवता येणार आहे.
- डॉ. मंदार फाटक
pitambari 2_1  

अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गुडुची वनस्पतीच्या सत्वातून पितांबरी ‘गुडुची टॅब्लेट’ तयार केल्या आहेत. त्यामुळे या गोळ्यांमधून गुडुचीची कार्यकारी तत्त्व जशीच्या तशी मिळतात. सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या पितांबरी ‘गुडुची टॅब्लेट’ सर्व केमिस्टमध्ये विाक्रीसाठी उपलब्ध आहेत. ६० टॅब्लेटची एक बॉटल १४२ रुपयांना असून ऑनलाईन मागणासाठी www.pitambari.comया संकेतस्थळावर तसेच घरपोच सेवा हवी असल्यास १८०० १०३ १२९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.